धक्कादायक ! आयएएस अधिकाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या

वृत्तसंस्था
Wednesday, 24 June 2020

कर्नाटकमधील आएएस आधिकारी विजय शंकर यांनी आत्महत्या केली आहे. काल (ता. २३) मंगळवारी रात्री बंगळुरु येथिल राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.  पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

बंगळुरू : कर्नाटकमधील आएएस आधिकारी विजय शंकर यांनी आत्महत्या केली आहे. काल (ता. २३) मंगळवारी रात्री बंगळुरु येथिल राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.  पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सीबीआयने खटला चालवण्यासाठी मागितली होती परवानगी
विजय शंकर हे आय मॉनेटरी अॅडव्हायजरी पाँझी योजना घोटाळ्यात अडकलेले होते. विजय शंकर यांच्यावर खटला चालवण्यासाठी सीबीआयने दोन आठवड्यांपूर्वी कर्नाटक सरकारकडे परवानगी मागितली होती. 

काय होता घोटाळा?
विजय शंकर यांनी आय मॉनेटरी अॅडव्हायजरी पाँझी योजना घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खान याला दीड कोटी रुपयांची लाच घेऊन क्लिन चीट दिली होती. या योजनेत जादा परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती. विजय शंकर यांच्या व्यतिरिक्त सीबीआय आणखी दोन अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे.  कर्नाटक सरकारला आय मॉनेटरी अॅडव्हायझरी ज्वेल्सच्या संदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. एल सी नागराज हे त्यावेळी बंगळुरु उत्तर तालुक्याचे सहाय्यक आयुक्त होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन त्यात तथ्य नसल्याचा अहवाल दिला. विजय शंकर यांनीही हा अहवाल मान्य करुन कुठल्याही चौकशीविना तो राज्य सरकारकडे पाठवला. गाव लेखापाल मंजुनाथ या अधिकाऱ्याने या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम पाहिले व आरोपी मन्सूर खान यांच्याकडून विजय शंकर यांच्या वतीने दीड कोटींची लाच घेतली होती. या योजनेतले बहुसंख्य गुंतवणूकदार हे मुस्लिम नागरिक असल्याचे सांगण्यात येते. हा एकूण ४००० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. हे प्रकरण एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसच्या आघाडी सरकार काळात झाले होते. त्यांनंतर कर्नाटकात भाजप सरकार सत्तेत आले आणि त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले.
-----------
लष्करप्रमुख मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर
-----------
भारत चीन वादात पडण्यास रशियाचा नकार
-----------
दरम्यानच्या काळात मन्सूर खान देश सोडून दुबईला पळाला. त्याचे नंतर प्रत्यार्पण करण्यात आले. या प्रकरणी सुमारे पंचवीस जणांना अटक करुन त्यांच्यावर खटला चालवण्यात येत आहे. हे प्रकरण २०१९ मध्ये उघडकीला आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS officer accused of graft in IMA scam dies by suicide in Bengaluru

Tags
टॉपिकस
Topic Tags: