esakal | IAS टीना डाबी आणि अतहर आमिर यांचा घटस्फोटासाठी अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

teena dabi

टीना डाबीने तिच्याच बॅचचा आयएएस अधिकारी अतहर आमिरसोबत लग्न केलं होतं. आता या दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं समोर येत आहे.

IAS टीना डाबी आणि अतहर आमिर यांचा घटस्फोटासाठी अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात टॉप आलेली टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी तिच्या कामामुळे आणि लग्नामुळे बरीच चर्चेत होती. टीना डाबीने तिच्याच बॅचचा आयएएस अधिकारी अतहर आमिरसोबत लग्न केलं होतं. आता या दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं समोर येत आहे.

आयएएस टीना डाबी आणि तिचा पती अतहर आमिर यांनी जयपूरच्या फॅमिली कोर्ट १ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. घटस्फोटाच्या अर्जात आम्ही यापुढे एकत्र राहू शकत नाही. न्यायालयाने आमचं लग्न शून्य घोषित करावं असं म्हटलं आहे. दोघेही 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या टीना डाबी वित्त विभागात संयुक्त सचिव तर आमिर सीईओ ईजीएस या पदावर आहे. 

हे वाचा - चुलत भाऊ-बहिणीचा विवाह बेकायदा; उच्च न्यायालयाने दिला निर्णय

लोकसेवा आयोगाने 2015 मध्ये घेतलेल्या परीक्षेत टीना डाबी टॉपर होती. तिने एप्रिल 2018 मध्ये अतहर आमिर याच्याशी लग्न केलं होतं. आमिरने युपीएससीमध्ये तिच्याच बॅचला देशात दुसरा क्रमांक मिळवला होता. टीना आणि अतहर हे राजस्थान कॅडरचे अधिकारी आहेत. दोघेही प्रशिक्षणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या लग्नानंतर टीना डाबीला ट्रोलही करण्यात आलं होतं. आंतरधर्मीय विवाह असल्यानं तिच्यावर टीका केली गेली. 

हे वाचा - ''लव्ह जिहादच्या शब्दांतून भाजप रचतोय देश तोडण्याचा डाव"

टीना डाबीने लग्नानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये आडनावात खान जोलडं होतं. तसंच काश्मीरी सून असा टॅगही अॅड केला होता. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरून आपल्या नावातून खान शब्द हटवला होता. तसंच टीनाने तिच्या फॉलोअर्सना ट्विटरवरून सांगितलं होतं की, तिने पतीला ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.