घशात चॉकलेट अडकल्यानं चिमुकल्याचा मृत्यू, असं काही घडलं तर काय करावं? जाणून घ्या

आठ वर्षाच्या मुलाच्या घशात चॉकलेट अडकलं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
if chocolate or thing stuck in throat
if chocolate or thing stuck in throat sakal

लहान मुलांना चॉकलेट, च्युईंगम खाणे खूप आवडते. पण असे पदार्थ घशात अडकण्याची भीती जास्त असते. असाच एक प्रकार तेलंगणामधून समोर आलाय. आठ वर्षाच्या मुलाच्या घशात चॉकलेट अडकलं ज्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  (if chocolate or thing stuck in throat know the home remedies)

तेलंगणा येथील कंघन सिंह हे पत्नी आणि चार मुलांसह राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियातून मुलांसाठी चॉकलेट्स आणली होती. त्यांच्या एका आठ वर्षाच्या मुलाने हे चॉकलेट खाल्लं आणि ते घशात अडकलं. ज्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आठ वर्षाच्या मुलाचं नाव संदीप सिंह होते.

संदीप सिंह हा दुसऱ्या वर्गात शिकायचा. संदीप सिंहने हे ऑस्ट्रेलियातून आणलेलं चॉकलेट्स शाळेत नेलं होतं. जेव्हा त्याने हे चॉकलेट खाल्लं तेव्हा चॉकलेट त्याच्या घशात अडकलं आणि त्याचा श्वास कोंडला. शिक्षिकांच्या लक्षात येताच शाळेच्या मदतीने संदीपला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र हॉस्पिटलला जाईपर्यंत संदीपचा जीव गेला.

if chocolate or thing stuck in throat
Viral Video: दहशतवाद्याशी तुलना करणाऱ्या प्राध्यापकाला विद्यार्थ्याचं सडेतोड उत्तर, मग पुढं…

चॉकलेट घशात अडकले तर काय करावं?

  • घशात अडकू नये यासाठी चॉकलेट चावून खावं

  •  घशात काही अडकल्यास जोरजोरात खोकला काढावा. ज्यामुळे अडकलेला पदार्थ घशाखाली येणार. 

  • लहान मुलांच्या घशात काही अडकलं आणि तो पदार्थ दिसत असेल, तरच बोट घालून काढण्याचा प्रयत्न करावा.

  • याशिवाय जर घशात काही अडकले आणि श्वास कोंडायला लागला तर त्या व्यक्तीच्या पाठीवर मारा ज्यामुळे अडकलेला पदार्थ घशाखाली येणार

  • तोंड खाली करायला सांगा आणि व्यक्तीच्या छातीवर एक हात ठेवून दुसऱ्या हातानं कंबरेवर जोरजोरात मारावं. यामुळे अडकलेला पदार्थ बाहेर येणार.

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे लगेच रुग्णालयात दाखल करावं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com