काँग्रेस अध्यक्ष झालो तर तरुणांना 50 टक्के पदं देणार; मल्लिकार्जुन खर्गेंची मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress President Election Candidate Mallikarjun Kharge

'हा आपल्या घरचा विषय आहे. आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे.'

काँग्रेस अध्यक्ष झालो तर तरुणांना 50 टक्के पदं देणार; मल्लिकार्जुन खर्गेंची मोठी घोषणा

Congress President Election 2022 : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेचा उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा काल (शनिवार) शेवटचा दिवस होता, त्यामुळं पक्षाच्या पुढील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) हे उमेदवार असतील, हे निश्चित झालंय.

पक्षाच्या अजेंड्याबाबत बोलताना खर्गे यांनी मोठी घोषणा केलीय. जर मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालो, तर पक्षात 50 टक्के पदं तरुणांना दिली जातील, असं त्यांनी आश्वासन दिलंय. याशिवाय, खर्गेंनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांच्याबाबतही वक्तव्य केलंय.

हेही वाचा: मुसलमान सर्वात जास्त कंडोम वापरतात, लोकसंख्या कुठं वाढतेय? ओवैसींचा भागवतांना थेट सवाल

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेचा शनिवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळं मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे पक्षाच्या पुढील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याचं निश्चित झालंय. सध्या अध्यक्षपदाच्या बाबतीत मल्लिकार्जुन खर्गे याचं पारडं जड मानलं जात आहे. आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान खर्गे म्हणाले, "जर मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालो, तर पक्षातील 50 टक्के पदं 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना दिली जातील." उदयपूर येथील चिंतन शिबिरात त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

हेही वाचा: Congress : काँग्रेस आमदारावर भ्याड हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, हल्ल्यानंतर वाहनांची तोडफोड

थरूर यांच्याविषयी खर्गे काय म्हणाले?

आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तेलंगणात दाखल झालेल्या मल्लिकार्जुन खर्गेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत काँग्रेसबाबत खुलेपणानं भाष्य केलं. त्याचवेळी त्यांनी प्रतिस्पर्धी शशी थरूर यांच्याबाबतही स्पष्ट मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "हा आपल्या घरचा विषय आहे. आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. एक व्यक्ती एकटा काम करू शकत नाही. त्यामुळं कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचंही त्यांनी मान्य केलं. त्याचबरोबर अध्यक्ष झाल्यानंतर हे सर्व बदल आपण अमलात आणणार आहोत, जेणेकरून पक्षाला भाजपशी टक्कर देता येईल, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

हेही वाचा: Congress MLA : राहुल गांधींना 'जोकर' म्हणणाऱ्या काँग्रेस आमदाराचं निधन