१९४७ मध्ये मोदींसारखं नेतृत्व असतं तर भारत सर्वाधिक समृद्ध असता - योगी आदित्यनाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi-Adityanath

"१९४७ मध्ये मोदींसारखं नेतृत्व असतं तर भारत सर्वाधिक समृद्ध असता"

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. भारताला जर १९४७ साली मोदींसारखं नेतृत्व मिळालं असतं तर भारत जगातील सर्वाधिक समृद्ध देश बनला असता, असं त्यांनी म्हटलं आहे.

योगी म्हणाले, "भारताला सध्या जी ओळख मिळाली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं, कारण त्यांनी जगाला भारतीय दृष्टी दिली. १९४७ मध्ये भारताकडे अशा प्रकारचं यशस्वी नेतृत्व असतं तर भारत जगातील सर्वाधिक समृद्ध देश, मोठी सामरिक शक्ती आणि आर्थिक ताकदवान देश बनला असता"

हेही वाचा: 'काँग्रेसला बदनाम करण्यासाठी मित्रपक्षांनी सुपारी घेतलीय?' पटोलेंनी दिले स्पष्टीकरण

"स्वातंत्र्यानंतर यापूर्वीच्या सरकारांच्या कालखंडांमध्ये कधीही असं काम झालं नाही. म्हणजेच भारताचा गौरव व्हावा असं एकही काम झालं नाही. जो लोक विभाजनाचं काम करतात ते प्रत्यक्षात तालिबानीकरणाला समर्थन देण्याचं काम करत आहेत. जे लोक सध्या जिन्नाचं समर्थन करत आहेत ते एक प्रकारे तालिबान्यांचंही समर्थन करत आहेत"

हेही वाचा: मास्क न वापरल्यानं अजितदादांनी रोहित पवारांना झापलं! म्हणाले...

विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा नाही. त्यांना सरदार पटेलांचा अपमान करायचा आहे. एकीकडे राष्ट्राचे नायक सरदार पटेल आहेत तर राष्ट्राचे विभाजन करणारे जिन्ना दुसरीकडे आहेत. ते लोक जिन्नांचे समर्थन करतात तर आम्ही पटेलांचं समर्थन करतो, असंही यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले.

loading image
go to top