19 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता : IMD | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain
19 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता : IMD

19 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत पावसाची शक्यता : IMD

नवी दिल्ली : देशात सध्या अत्यंत विषम पद्धतीच्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी थंडीची लाट तर काही ठिकाणी गारपीट, पाऊस (Thunderstorm Rain) अशी स्थिती आहे. त्यातच आता हवामान खात्यानं १९ राज्ये (States) आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (Uts) येत्या चार-पाच दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तरेकडील राज्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देतानाच यापासून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. (IMD predicts rainfall in 19 states UTs during next 4 to 5 days)

हेही वाचा: पुण्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी - अजित पवार

हवामान खात्याच्या माहितीनुसार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमधील गंगेचं खोरं इथं सौम्य ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर १५ जानेवारी रोजी विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला होता. तर नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रुपुरा आणि आंध्र प्रदेशसाठी १५ आणि १६ जानेवारी रोजी पावसाची शक्यता असल्याचं म्हटलंय. तर पश्चिम हिमालयीन राज्यांमध्ये १६ ते १९ जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दाट धुकं आणि थंडीच्या लाटेचा इशारा

पुढील तीन ते चार दिवसात ईशान्य भारतात बहुतांश ठिकाणी दाट धुकंही राहण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पुढील दोन दिवसात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.

लोकांना काळजी घेण्याचं आवाहन

थंडीच्या भागातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. डोक, मान, हात आणि पाय यांची थंडीपासून काळजी घ्या, त्यासाठी सैल कपडे, गरम लोकरीचे कपडे परिधान करा असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IMDDesh newsDelhi Rain
loading image
go to top