'ही फक्त सुरुवात, खरी लढाई बाकी आहे' ;इम्तियाज जलील यांचा इशारा

Imtiyaz Jaleel
Imtiyaz JaleelEsakal

मला अडवण्याची पूर्ण तयारी केली होती तरीही मी पुर्ण ताकत लावली आहे. अखेर मी मुंबईत आलोच. मी मुंबईत येऊ नये यासाठी खूप मोठे प्रयत्न केले गेले. ही फक्त सुरुवात आहे. खरे आंदोलन बाकी आहे. रॅली ( AIMIMRally) दरम्यान अनेकदा पोलिसांनी अडवलं. अन्याय होत असल्यास आम्ही गप्प बसणार नाही. आरक्षणासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहणार. निवडणुकांच्या वेळी जनतेची आठवण येते. मी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचे आभार मानतो. 'ही फक्त सुरुवात आहे खरी लढाई बाकी आहे' असा इशारा खासदार इम्तियाज जलील (AIMIM Rally) यांनी दिला आहे. मुंबईत चांदिवली सभास्थळी ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली.

इम्तियाज जलील म्हणाले, अखेर मी मुंबईत (Mumbai)आलोच. ही फक्त सुरूवात आहे. रॅलीदरम्यान अनेकदा पोलिसांनी आम्हाला अडवलं. मात्र, आम्ही पोलिसांना दोषी ठरवणार नाही. मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. मी मुंबईत येऊ नये, यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मला अडविण्यासाठी पोलिसांवर दबाव होता. मात्र, मी मुंबईत आलोच. निवडणुकांपुरतीच मुस्लिमांची प्रत्येक पक्षाला आठवण येते. परंतु, त्यांच्या आरक्षणाचं कोणीचं मनावर घेत नाही. आम्ही या रॅलीबाबत प्रत्येकांना निमंत्रण दिलं होतं, पण कोणी आले नाहीत, कारण ती त्यांची लायकीच नाही, असंही ते म्हणाले. शेवटी त्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी, काॅंग्रेस व भाजपवर (Shiv Sena, NCP, Congress , BJP) जोरदार निशाणा साधला.

राज्य सरकारचे मुसलमानांकडे दुर्लक्ष होत आहे. आमच्या गाड्यांवर फक्त तिरंगा होता. आम्हाला झेंडा काढायला लावला. आम्हाला आमच्या जमिनी परत द्या.राज्यकर्ते आम्हाला घाबरले आहेत. आपल्या जनतेला फसवण्यात आलंय. मला थांबवण्यासाठी ओमिक्रोनचे कारण देत रात्री बारा वाजता नोटिफिकेशन काढण्यात आलं. मात्र आम्ही थांबणार नाही.असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. एमआयएम निवडणुकीत उतरणार आहे. त्यांची भूमिका आणि रणनीती एमआएमचे प्रमुख असदुद्दीन ओविसी यांच्या भाषणाने समजणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com