पोलिसांऐवजी नागरी कार झाली लक्ष्य, माओवादी हल्ल्यात १२ जण जखमी

'या स्फोटात गाडीमध्ये बसलेले १२ नागरिक जखमी झाले. यात एका महिलेचाही समावेश आहे.'
Chhattisgarh Maoist attack
Chhattisgarh Maoist attack

रायपूर: छत्तीसगडच्या घोटीयामध्ये (Chhattisgarhs Ghotiya) गुरुवारी माओवाद्यांनी (IED) चा स्फोट घडवून आणला. यामध्ये गाडीतील १२ नागरिक जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. माळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या घोटीया गावात (Ghotiya village) आज सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. रायपूरपासून (Raipur) ४०० किमी अंतरावर हे गाव आहे.

"या स्फोटात गाडीमध्ये बसलेले १२ नागरिक जखमी झाले. यात एका महिलेचाही समावेश आहे" असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले. नारायणपूरहून आलेली बोलेरो कार दंतेवाडाच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाला.

Chhattisgarh Maoist attack
महिला हॉकी संघाला घर, कार देण्याचा हिरे व्यावसायिकाचा शब्द

स्फोट झाल्यानंतर सुरक्षापथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, माओवाद्यांनी पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करण्यासाठी IED पेरले होते. पण नागरिकांची गाडी जात असताना स्फोट झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com