
VIDEO: बुलेटवर हवा करणाऱ्यांची पोलिसांनी काढली हवा
आजकाल तरुणांना प्रसिद्ध व्हायची भारी हौस असते. विविध प्रकारचे व्हिडीओ (Video) करायचे आणि सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करायचे हा उद्योग अनेकजण करत असतात. बरेच जण चांगला कंटेटही देतात, मात्र तरीही काहीतरी विचित्रपणा करून लोकांचं लक्ष वेधून घेणाऱ्यांची संख्याही कमी नाही. काहीजण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र सोशल मीडियावर अशी हवा करणं दोन तरूणांच्या अंगलच आलंय. पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई (Police Action) केली आहे. या युवकांचा (youth) हात जोडतानाचा फोटो शेअर होत आहे.
हेही वाचा: VIDEO: सॅल्युट! इंडियन आर्मीच्या वीर जवांनाचं New Year सेलिब्रेशन बघाच
व्हायरल झालेल्या या तरूणांच्या व्हिडीओमध्ये दोन तरूण एका रस्त्यावरून बुलेटवरून जात आहेत. तसं जाण्यात काहीच गैर नाही, परंतु यापैकी एक तरूण बुलेट चालवणाऱ्या त्याच्या मित्राच्या खांद्यावर बसून मस्तपैकी सिगारेट (Cigarettes) ओढत आहे. विशेष म्हणजे त्याच्या दुसऱ्या हातात पिस्तुल (Pistol) दिसत आहे. दहशत पसरवणाऱ्या या व्हिडीओला 'खलनायक' हे कॅप्शन दिलं आहे.गाडीच्या नंबरवरून ही गाडी गुजरातमधील असल्याचे दिसतंय.
हेही वाचा: Viral Video: ट्रेनची वासराला धडक; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी या व्हिडीओतील दोन्ही तरुणांवर कारवाई केली आहे. या दोन्ही तरूणांना पोलिसांनी माफी मागितल्याचं दिसतंय. त्यांचा हात जोडतानाचा फोटो शेअर होत आहे.
Web Title: In Gujarat Police Have Cracked Down On Rioting Youths With Bullets
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..