वरमालाऐवजी वधू-वरांनी घातले मास्क; व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ

यापूर्वीदेखील लग्न समारंभातील भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
वरमालाऐवजी वधू-वरांनी घातले मास्क; व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ

सोशल मीडियावर अनेकदा लग्न समारंभातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकरीदेखील या व्हिडीओंना पसंती देतात. मात्र, सध्या देशावर कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक जणांना अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करावा लागत आहे. मात्र, या लग्नसोहळ्यांमध्येही भन्नाट घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच एका जोडप्याने सोशल डिस्टंसिंग म्हणून काठीच्या सहाय्याने एकमेकांना वरमाला घातल्या होत्या. त्यानंतर आता एका जोडप्याने वरमाला ऐवजी चक्क एकमेकांना मास्क घातले आहेत. (in-wedding-bride-and-groom-wear-masks-instead-of-garlands)

वरमालाऐवजी वधू-वरांनी घातले मास्क; व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ
फुकटात बर्गर न दिल्यामुळे पोलिसांनी घेतलं हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात

सध्या सोशल मीडियावर या मास्क-मालेचा व्हिडीओ तुफान चर्चिला जात आहे. कोरोना काळात स्वत:च व कुटुंबाचं संरक्षण करायचं असेल तर मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने या जोडप्याने ही भन्नाट आयडिया वापरली. मात्र, या लग्नातील फोटो व व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांना हसू अनावर झालं आहे. हा व्हिडीओ प्रशासकीय अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला होता.

वरमालाऐवजी वधू-वरांनी घातले मास्क; व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ
भर मांडवात नवराई रुसली; होणाऱ्या पतीचा केला असा अपमान
वरमालाऐवजी वधू-वरांनी घातले मास्क; व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ
Corona Effect: काठीच्या सहाय्याने घातल्या एकमेकांना वरमाला

दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर लग्नातील असे भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र, हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून या जोडप्याचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी मात्र, त्यांची खिल्ली उडवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com