राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी; 8 वर्षातील उच्चांक | Heatstroke in Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heatstroke Victims in Maharashtra
राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी; 8 वर्षातील उच्चांक | Heatstroke in Maharashtra

राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी; 8 वर्षातील उच्चांक

Heatstroke Victims in Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात उष्णतेची लाट आलेली आहे. राज्यातील विविध भागांतील तापमानात विक्रमी वाढ झालेली आहे. दरम्यान राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघातामुळे 25 जणांचा बळी गेला आहे, तर 374 जणांना उष्माघातची बाधा झाली आहे. गेल्या 8 वर्षातील उष्माघाताच्या बळींचा हा उच्चांक ठरला आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने बळी पडलेल्यांची संख्या सर्वाधिक असून आतापर्यंत 11 लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे खासकरून विदर्भात नागरिक हैराण झाले आहेत. (25 victims of heatstroke in the last two months in the Maharashtra; 8 year high)

हेही वाचा: विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट

मार्च महिन्यापासून राज्यातील उष्णतेचा पारा कायमच वाढत आहे. कधी उन्हाच्या झळा तर कधी अवकाळी पाऊस, यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पारा ४३ अंशांच्या वर पोचल्यामुळे उन्हाचे चटके असह्य झाले आहेत. विदर्भासह राजस्थान आणि मध्यप्रदेशातही उष्णतेची लाट आली असून, पुढील पाच दिवस ही स्थिती कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हेही वाचा: राज्यात दोन दिवस पाऊस, पुन्हा उष्णतेची लाट; हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याची अनुभूती बुधवारी राज्यातील चाळीशीपार गेलेल्या तापमानावरून आली आहे. कोकण वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरी ४३ अंशावर होते. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

Web Title: 25 Victims Of Heatstroke In The Last Two Months In The Maharashtra 8 Year High

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vidarbhaTemperature
go to top