esakal | दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट; 10 दिवस आधीच लाल किल्ला बंद
sakal

बोलून बातमी शोधा

red fort

15 ऑगस्टच्या आधी दिल्लीत घातपात करण्याचा कट रचला जात असल्याचं गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्थांनी दिल्ली पोलिसांना सावध केलं आहे.

दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट; 10 दिवस आधीच लाल किल्ला बंद

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत 15 ऑगस्टच्या आधी आणि पावसाळी अधिवशेन यांच्या दरम्यान ड्रोन हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे. सुरक्षा संस्थांनी याबाबत अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अलर्टनुसार दहशतवादी ड्रोन ह्लला करून दिल्लीत मोठा घातपात करण्याची तयारी करत आहेत. 15 ऑगस्टच्या आधी दिल्लीत घातपात करण्याचा कट रचला जात असल्याचं गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्थांनी दिल्ली पोलिसांना सावध केलं आहे. 5 ऑगस्टला काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. याच दिवशी हल्ला करण्याचा कट असल्याचं म्हटलं जात आहे. लाल किल्ला 10 दिवस आधीच 15 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांसह सर्व सुरक्षा संस्थांना सतर्क करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेबाबत केंद्रीय संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. ड्रोन हल्ल्याचा धोका रोखण्यासाठी पहिल्यांदा विशेष ट्रेनिंगसुद्धा दिल्ली पोलिसांसह इतर सुरक्षा दलांना देण्यात आलं आहे. यामध्ये सॉफ्ट किल आणि हार्ड किल ट्रेनिंगचा समावेश आहे. दिल्लीत एखादा ड्रोन संशयास्पद आढळला तर तो जॅम करणं किंवा उडवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं आहे.

हेही वाचा: भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!

ड्रोन हल्ल्याचा धोका पाहता इंडियन एअर फोर्सच्या मुख्यालयात एक ड्रोन कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. याठिकाणी पोलिस दलाशिवाय इतर कोणतीही संस्था सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जरी ड्रोन उडवत असेल तरी त्याचे मॉनिटरिंग होईल. याबाबतसुद्धा कंट्रोल रुमला माहिती द्यावी लागेल.

यावेळी 4 अँटि ड्रोन सिस्टिम लाल किल्ल्यावर लावण्यात आल्या आहेत. लाल किल्ल्याची आणि स्वातंत्र्यदिनी उपस्थित पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी 330 विशेष आणि अत्याधुनिक असे कॅमेरे लाल किल्ल्याच्या परिसरात लावण्यात आले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमामुळे लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. याबाबत भारतीय पुरातत्व विभागाने आदेश जारी केला असून आजपासून 15 ऑगस्टपर्यंत किल्ल्यात प्रवेशाला बंदी असणार आहे.

loading image