लखनौ : सौदी अरेबियातील (Saudi Arabia) जेद्दाहहून लखनौकडे येणाऱ्या एसव्ही 3112 हज विशेष विमानात रविवारी (15 जून) सकाळी लँडिंग करताना एक गंभीर तांत्रिक अडचण निर्माण झाली. लखनौ विमानतळावर (Lucknow Airport) सकाळी 6:30 वाजता लँडिंग दरम्यान विमानाच्या चाकांतून ठिणग्या आणि धूर निघताना दिसून आला, त्यामुळे काही क्षण गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.