India Alliance vote theft protest 2025 : 'वोट चोरी'च्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. इंडिया आघाडीचे खासदार आज, सोमवार (११ ऑगस्ट २०२५) रोजी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत महामोर्चा काढणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात इंडिया आघाडीचे सुमारे ३०० खासदार सहभागी होणार असल्याची माहिती आहे.