

Putin Modi meeting
ESakal
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भेटीदरम्यान पंतप्रधान म्हणाले, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, २३ व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी राष्ट्रपती पुतिन यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. पंचवीस वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आमच्या धोरणात्मक भागीदारीचा पाया रचला.