इंडिया आघाडीची महारॅली, रामलीला मैदान परिसरात ४ हजार पोलीस, २०० सीसीटीव्ही आणि कंट्रोल रूम

INDIA Bloc Mega Rally in Delhi विरोधकांच्या इंडिया आघाडीने दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महारॅलीचे आयोजन केलेय. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
INDIA Bloc Mega Rally in Delhi

INDIA Bloc Mega Rally in Delhi

Esakal

Updated on: 

दिल्लीत आज रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची रॅली होणार आहे. यात विरोधी पक्ष, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना सहभागी होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ही रॅली काढली जाणार आहे. रॅलीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी परिसरात कडेकोड बंदोबस्त तैनात केला आहे.

Loading content, please wait...