India Census 2026 Begins April 1
esakal
देशात २०११ नंतर पहिल्यांदाच जनगणना होणार आहे. ही १६वी जनगणना असून तिची सुरुवात १ एप्रिलपासून होणार आहे. यंदाची जनगणना अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. यावेळी नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून भरता येणार आहे. यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. यात घराची रचना, वापरले जाणारे धान्य आणि अगदी तुमच्याकडे असलेल्या वाहनांच्या प्रकारांचीही सविस्तर माहिती घेतली जाणार आहे.