मिनिकॉय बेटावर केंद्र सरकार उभारणार नवीन विमानतळ; लष्करी आणि व्यावसायिक विमाने उतरवता येणार

मालदीवने विनाकारण उकरून काढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्या देशाला धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने दळणवळण यंत्रणा भक्कम करण्याचा निर्णय घेतला
india central government lakshadweep plan airport air force plane landing on minicoy island politics
india central government lakshadweep plan airport air force plane landing on minicoy island politicsSakal

नवी दिल्ली : मालदीवने विनाकारण उकरून काढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्या देशाला धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने दळणवळण यंत्रणा भक्कम करण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आगामी काळात मिनिकॉय बेटावर नवीन विमानतळ उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिनिकॉय विमानतळावर लष्करी आणि व्यावसायिक विमाने उतरू शकतील, असा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून विमानतळ उभारले जाणार आहे. हे विमानतळ उभारण्यात आले तर हवाई दलाला मालदीवसोबतच हिंद महासागरातील हालचालींवर देखील लक्ष ठेवता येईल. सध्या या विमानतळाच्या उभारणीचा प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित आहे.

येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यावसायिक विमाने उतरतील, अशा पद्धतीने येथे सोयी सुविधांचा विकास केला जाईल. या प्रस्तावित मिनिकॉय विमानतळामुळे हवाई दल तसेच नौदलाला अरबी समुद्रात संचलन करता येणार आहे.

अलीकडील काळात समुद्री चाच्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. या विमानतळामुळे त्याला लगाम तर बसेलच पण चीनच्या सागरी हालचालींवरही त्यामुळे लक्ष ठेवता येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com