भारत-चीन तणाव : "लष्करी पातळीवर चर्चा सुरु पण अद्याप तोडगा नाही - राजनाथ सिंह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

भारत आणि चीनच्या दरम्यान मे महिन्याच्या सुरवातीपासून वास्तविक नियंत्रण रेषेवर सुरु झालेला तणाव अद्याप कायम आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या दरम्यान मे महिन्याच्या सुरवातीपासून वास्तविक नियंत्रण रेषेवर सुरु झालेला तणाव अद्याप कायम आहे. दोन्हीही बाजूंनी सैन्य तैनात असून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये. दोन्ही पक्षांमध्ये लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र त्यातून सकारात्मक असा कोणता मार्ग निघाला नाहीये. या पार्श्वभूमीवरच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी म्हटलंय की LAC वर तणाव संपुष्टात आणण्यासाठी चीनसोबत रणनीतीद्वारे तसेच लष्करी पातळीवरील चर्चेअंती देखील काही समधानकारक तोगडा निघाला नाहीये. त्यांनी म्हटलंय की परिस्थिती अद्याप 'जैसे थे' आहे.  

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय की, जर परिस्तिथी 'जैसे थे' राहिली तर सैनिकांची तैनात कमी करता येणार नाही. त्यांनी भारत-चीन सीमा प्रकरणी Working Mechanism for Consultation & Coordination (WMCC) म्हणजेच सल्लामसलत व समन्वय कार्ययंत्रणेच्या प्रणालीचा उल्लेख केला. याची बैठक या महिन्याच्या सुरवातीला झाली होती. सोबतच त्यांनी म्हटलं की पुढची लष्करी पातळीवरची चर्चा कधीही होऊ शकते. 

हेही वाचा - Corona Update : नव्या स्ट्रेनचे 20 रुग्ण आढळले; गेल्या 24 तासांत 286 रुग्णांचा मृत्यू

पुढे त्यांनी म्हटलंय की, हे खरंय की, भारत आणि चीनच्या दरम्यान तणावाची परिस्थिती समाप्त होण्यासाठी सैन्य आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा प्राप्त झाला नाहीये आणि परिस्थिती 'जैसे थे'च आहे. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की सैन्याची तैनात कमी करता येणार नाही. सध्या चर्चा सुरु आहे आणि सकारात्मक परिणामांची अपेक्षा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china border conflict rajnath singh says no meaningful outcome of talks on lac