India China Border Issue : पूर्व लडाखमध्ये भारताने गमावले 26 पेट्रोलिंग पॉईंट्स : रिपोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

India China Border Issue : पूर्व लडाखमध्ये भारताने गमावले 26 पेट्रोलिंग पॉईंट्स : रिपोर्ट

India China Border Issue : भारत आणि चीनमधील वाढत्या तणावांच्या घटनामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त प्रकाशित केले आहे.

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

पूर्व लडाखमध्ये असलेल्या एकूण ६५ पेट्रोलिंग पॉइंट्सपैकी २६ पॉइंट्स गमावल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडलेल्या देशातील सर्वोच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या वार्षीक परिषदेत सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टचे इमरजन्सी लँडिंग

रिपोर्टमधून समोर आलेल्या या माहितीनंतर काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर टॅग करत चीनला तुम्ही दिलेल्या क्लीन चिटमुळे देशाची बदनामी होत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: KL Rahul Athiya Shetty Marriage : लग्नात कोहलीनं दिलं 'विराट' गिफ्ट, तर, धोनीनं...

रिपोर्टमध्ये नेमकं काय?

पेट्रोलिंग पॉईंट्सबाबत सादर करण्यात आलेल्या या रिपोर्टमध्ये २६ पॉईंट्सवर आयएसएफ किंवा भारतीय नागरिकांची उपस्थिती बऱ्याच काळापासून दिसलेली नसल्याचे नमुद करण्यात आले आहे.

या भागांवर भारतीय लष्कराची कमी होत असलेल्या उपस्थितीमुळे आयएसएफच्या नियंत्रणाखालील सीमा बदलेल. दरम्यान, याबाबत अद्यापपर्यंत केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.