भारत-चीन तणाव : '...त्यापेक्षा एकच दिवस पण सिंहासारखं जगा'; ड्रॅगनसमोर वाघाची शड्डू ठोकून गुरगुर

india china
india china

इटानगर : भारत-चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यादरम्यानच या सीमेवर असलेला एक साईनबोर्ड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या साईनबोर्डवर लिहलेले एक वाक्य भारतीय सैनिकांच्या निश्चयाचे तसेच जिद्दीचे दर्शन घडवून आणतो. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरवर LAC जवळील ITBP च्या मुख्य चौकीवर लावलेल्या साईनबोर्डवर लिहलंय की, It is better to live one day as Lion than a hundred years as sheep म्हणजेच आयुष्यभर मेंढरासारखे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगणे केंव्हाही चांगले...

हे वाक्य भारताला गुलाम बनवणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीशी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या म्हैसूरचा राजा टीपू सुल्तानने स्वत:साठी म्हटलं होतं. ITBP च्या चौकीवर लावलेला हा साईनबोर्ड तसा जुना आहे. मात्र चीनसोबतच्या प्राप्त तणावाच्या परिस्थितीत हे वाक्य भारतीय सैन्याच्या जिद्दीचे दर्शन घडवून आणतो. LAC जवळ गेल्या 7 महिन्यांपासून भारतीय सैनिक निर्धाराने सीमेचे रक्षण करत आहेत. तसेच ते चीनच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही सैनिकांचा निश्चय आणि उत्साह कमी झाला नाहीये.

याकच्या माध्यमातून आवश्यक सामानांचे दळणवळण
सैनिकांसाठी याक हा प्राणी खूपच मदतनीस ठरत आहे. याकच्या माध्यमातून उंच आणि अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी सैन्य तुकड्यांपर्यंत इंधन पोहोचवले जात आहे. तवांग सेक्टरमध्ये ITBP चौकीमध्ये तैनात एका जवानाने सांगितलं की 90 किलो वजनापर्यंत सामान याकच्या माध्यमातून वाहून नेता येते.

15,500 फूटावर तैनात आहेत जवान
ITBP च्या जवानाने सांगितलं की, आम्ही इथे 15,500 फूट उंचीवर असणाऱ्या सैनिकांसाठी इंधनासारख्या आवश्यक सामानांचा पुरवठा करत आहोत. या दळणवळणासाठी आम्ही याकचा वापर करत आहोत. याकचे वैशिष्ट्य हे आहे की, उंच डोंगरावर दुर्गम अशा ठिकाणी जवळपास 90 किलो सामान वाहून नेता येते.

लवकरच होईल चर्चेची पुढची फेरी
भारत आणि चीनदरम्यानचा सीमा तणाव अद्याप समाप्त झाला नाहीये. या उभय देशांत लष्करी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र कोणताही यशस्वी तोडगा निघाला नाहीये. या चर्चेची शेवटची बैठक 18 डिसेंबर रोजी झाली होती. लवकरच पुढची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com