esakal | सीरो सर्व्हे जाहीर झाल्यानंतर केंद्राची 7 पॉईंट अ‍ॅडव्हायजरी
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

आतापर्यंत 67.6 टक्के भारतीयांमध्ये कोरोना संसर्गामुळे किंवा लसीकरणाच्या माध्यमातून अँटिब़ॉड़ी तयार झाल्या आहेत.

सीरो सर्व्हे जाहीर झाल्यानंतर केंद्राची 7 पॉईंट अ‍ॅडव्हायजरी

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. दुसरी लाट ओसरली असली तरी काही राज्यांमध्ये मात्र चिंता वाढवणारी परिस्थिती आहे. आता केंद्राकडून देशातील चौथ्या सीरो सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार आतापर्यंत 67.6 टक्के भारतीयांमध्ये कोरोना संसर्गामुळे किंवा लसीकरणाच्या माध्यमातून अँटिब़ॉड़ी तयार झाल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने पर्यटकांना इशारा दिला आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय प्रवास करू नये असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं असून याबाबत अॅडव्हायजरी जारी केली आहे.

1. सरकारने म्हटलं आहे की, लोकांनी प्रवास करणं टाळायला हवं. जर दोन्ही डोस घेतले असतील तरच प्रवास करावा.

2. चौथ्या सिरो सर्वेतून दिलासादायक असं चित्र समोर आलं आहे. पण एवढ्यावरच समाधान मानणं योग्य नाही. देशातील 32 टक्के लोकसंख्या अजुनही असुरक्षित आहे. अशा परिस्थितीत निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.

3. स्थानिक किंवा जिल्हा पातळीवर परिस्थिती वेगळी असू शकते. कारण राष्ट्रीय सीरो सर्व्हे हा देशाच्या इम्यून सिस्टिमचं एक चित्र असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

हेही वाचा: महिलेला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग; देशातील पहिलाच रुग्ण

4. राज्यांनी स्थानिक सीरो सर्व्हे सुरु ठेवला पाहिजे. ज्यामुळे माहिती होते की कोरोनाविरोधा अँटिबॉडी किती टक्के लोकांमध्ये आहे. यामुळे राज्य पातळीवर उपाययोजना राबवणं सोपं जाईल.

5. आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की, सीरो सर्व्हेचे निष्कर्षातून असं दिसतं की भविष्यात कोरोनाची आणखी लाट येण्याची शक्यता आहे. कारण काही राज्यांमध्ये इम्यूनिटी जास्त आहे तर काही राज्यात कमी आहे. ज्या राज्यांमध्ये सीरो सर्व्हेत कमी इम्यूनिटी असल्याचं समोर आलंय तिथं कोरोनाच्या लाटेचा धोका जास्त आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 50 लाख मृत्यू?

6. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जात आहेत. यामुळे फक्त पर्यटनस्थळांवरच नाही तर स्थानिक बाजारपेठांमध्येही गर्दी वाढली आहे. मात्र अद्याप काही राज्यांनी पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. विनाकारण प्रवास करणं लोकांनी टाळायला हवं असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

7. अनेक राज्यांनी सार्वजनिक सभा घेण्यासाठी नियमांमध्ये सूट दिली आहे. पण परिस्थिती पाहता सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सभा घेऊ नये असंही केंद्राने म्हटलं आहे.

loading image