esakal | Corona Update: देशात 56 दिवसानंतर बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे.

देशात 56 दिवसानंतर बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासांत देशात 45 हजार 892 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर 44 हजार 391 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या जवळपास दोन महिन्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 817 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 07 लाख 09 हजार 557 इतकी झाली आहे, तर 2 कोटी 98 लाख 43 हजार 825 कोटी रुग्णांनी आतापर्यंत विषाणूवर मात केली आहे. देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 60 हजार 704 सक्रिय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 05 हजार 028 लोकांना कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा: धक्कादायक! हैतीच्या अध्यक्षाची घरात घुसून हत्या

देशात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत देशातील 36 कोटी 48 लाख 47 हजार 549 लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 33 लाख 81 हजार 671 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लसीकरणच हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे केंद्र सरकार लसीकरणावर भर देत आहे.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी

राज्यात बुधवारी 9,558 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, तर नवीन 8,899 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,81,167 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,14,625 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.05% झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोप यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

loading image