'या' लोकांमुळे पसरतो कोरोना; अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या प्रसाराबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
Corona Update
Corona Updatesakal

Covid19: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या प्रसाराबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. लसीकरण न केलेल्या लोकांसोबत राहण्यामुळे लसीकरण झालेल्यांना कोरोनाचा धोका वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

(Corona Updates in India)

सर्वांनी लसीकरण करणं गरजेचं आहे. कॅनेडियन मेजिकल असोशिएशनच्या रिपोर्टनुसार ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांच्या रिपोर्टमधील माहितीनुसार, ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे त्या ठिकाणी लसीकरण झालेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. टोरंटो विद्यापीठातील दाला लाना पब्लिक हेल्थचे को-रायटर डेविड फिसमॅन यांनी सांगितलं की, लोकांमध्ये लसीकरणासाठी जागृती निर्माण करणे हे या संशोधनाचा उद्देश आहे.

Corona Update
'काश्मीर फाईल्स पेक्षा मोठमोठ्या फाईल्स इथल्या गल्लीबोळात घडतात'

डेविड यांनी सांगितलं की, लसीकरणाशिवाय पासपोर्ट मिळत नसल्याने आम्ही हे संशोधन सुरु केलं होतं. सार्वजनिक आरोग्य अशी गोष्ट आहे ज्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. पण या संशोधनामध्ये लसीकरण केलेल्या व्यक्तींना लसीकरण न केलेल्या व्यक्तींपासून जास्त धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हा लसीकरण न करणारे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोरोना संक्रमनाचा धोका कमी असतो पण लसीकरण केलेल्यांना त्यांच्यापासून जास्त धोका असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.

लसीबाबत जनजागृती आवश्यक आहे

ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतले नाहीत ते लोकं कोरोनाच्या SARS-CoV-2 या नवीन प्रकाराने त्रस्त होऊ शकतात असं सांगितलं गेलं आहे. लसीकरण न केल्याने केवळ लसीकरण न झालेल्या लोकांसाठीच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही धोका असतो, असे अभ्यासात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com