esakal | अनलॉक 1 नंतर भारतात कोरोनाचा वेग भीतीदायक, लॉकडाऊनसोबत रुग्णही वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

india covid 19 graph after unlock

भारतात लॉकडाऊनसोबत कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून अनलॉक 1 नंतर यामध्ये भीतीदायक अशी वाढ दिसून आली आहे.

अनलॉक 1 नंतर भारतात कोरोनाचा वेग भीतीदायक, लॉकडाऊनसोबत रुग्णही वाढले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. 09 : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनचे नियम एक जूनपासून शिथिल करत अनलॉक 1 केलं आहे. यामध्ये काही प्रमाणात व काही भागात सूट देण्यात आली आहे. मात्र या अनलॉक एकमध्ये पहिल्या पाच दिवसातच कोरोनाच्या रुग्णांमध्ये 50 हजारांची भर पडली. तज्ज्ञांच्या मते भारतात अद्याप कोरोनाचा कहर झालेला नाही. पण जूनच्या पहिल्या आठवड्यात समोर आलेली आकडेवारी भीतीदायक आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण आता कित्येक पटींनी वाढलं आहे. जूनच्या सुरवातीपासून दररोज 9 ते 10 हजार रुग्ण सापडत आहेत.

गेल्या पाच दिवसांत भारतामध्ये 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊनमधअये सूट दिल्यानंतर इतक्या वेगानं वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडला होता. त्यानंतर कोरोनाने 100 रुग्णांचा आकडा गाठण्यासाठी 15 मार्च उजाडला होता. पण त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली. पुढच्या 64 दिवसांतच भारतात एक लाख रुग्णांची संख्या पार झाली. पहिला रुग्ण ते एक लाख रुग्ण हा टप्पा भारताने 109 दिवसांत पार केला. 

कोरोनाबाबत अमित शहांचा विरोधकांनाच सवाल; सोशल मीडियावर झाले ट्रोल

पहिल्या शंभर दिवसांत भारतातील रुग्णसंख्या ही अमेरिका, स्पेन यासारख्या देशांच्या तुलनेत निम्मी होती. भारतात 20 मे पर्यंत रुग्णसंख्या नियंत्रणात होती. त्यानंतर पुढच्या दहा दिवसांनी लॉकडाऊन 4 संपला. त्यानंतर देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला. दोन जूनला भारताने दोन लाख रुग्णसंख्या गाठली होती. दोन जूननंतर 8 जूनपर्यंत भारतात आणखी 50 हजार रुग्णांची भर पडली. यामुळे भारतात अडीच लाख कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. 

कोरोनावरील उपचाराची नवी उमेद; भारतात सुरु झाला हा प्रयोग

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 7471 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 271 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अडीच लाख रुग्णांपैकी 1.24 लाख रुग्ण ठणठणीत बरे झाले असून सध्या 1.25 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. भारतात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 48.35 टक्के इतके आहे तर मृत्यूदर 3.89 टक्के इतका आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत टॉपला असलेल्या पाच देशांपैकी रशिया आणि भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे.

टाळेबंदी लागू न करता जपानने कसे रोखले कोरोना विषाणूला?

भारतात कोरोनाने महाराष्ट्रात सर्वाधिक कहर केला आहे. देशातील रुग्णांच्या 36 टक्के इतके रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राने 90 हजार रुग्णांचा आकडा ओलांडला आहे. तर तामिळनाडुत जवळपास 32 हजार रुग्ण आढळले आहेत. याशिवाय दिल्लीत 28 हजार तर गुजरातमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 

loading image