esakal | भारतात 133 दिवसांनी कोरोनाबाबत आनंदाची बातमी, पहिल्यांदाच समोर आली 'अशी' आकडेवारी 
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांचा आलेख चढताच आहे. यात पहिल्यांदाच एक दिलासादायक अशी बातमी आली आहे. 

भारतात 133 दिवसांनी कोरोनाबाबत आनंदाची बातमी, पहिल्यांदाच समोर आली 'अशी' आकडेवारी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. 10 : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहेत. जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या दोन आठवड्यात कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. जूनमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात तब्बल 60 हजारांहून अधिक रुग्ण भारतात सापडले. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला. त्यानंतर आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांचा आलेख चढताच आहे. यात पहिल्यांदाच एक दिलासादायक अशी बातमी आली आहे. 

देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे एकूण रुग्ण 2.76 हजार आहेत. यापैकी 1 लाख 33 हजार 632 रुग्णांवर उपचार सुरू असून 1 लाख 35 हजार 206 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

सॅटेलाइट फोटोंमधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर, चीनमध्ये काय घडलं?

गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 9985 रुग्ण आढळले आहेत. तर 279 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत भारतात कोरोनाचे एकूण 276583 रुग्ण सापडले. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 7745 पर्यंत पोहोचली आहे. देशात कोरोनाचा कहर सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 90 हजारांच्या पार गेली असून आतापर्यंत 3289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाबाबत अमित शहांचा विरोधकांनाच सवाल; सोशल मीडियावर झाले ट्रोल

महाराष्ट्रासह देशातील आणखी पाच राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. तामिळनाडुमध्ये कोरोनाचे 34014 रुग्ण असून आतापर्यंत 307 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाने कहर केला असून कोरोनाचे 31309 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 905 रुग्णांचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये 21 हजारांहून अधिक रुग्ण असून आतापर्यंत 1313 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशात 11335 रुग्ण असून 301 जणांचा मृत्यू झाला आहे.

loading image