

India Crude Oil Imports Remain Nearly Stable but Import Spending Jumps to 90 Point 6 Billion Dollars Between April and September
sakal
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढलेल्या किमती यांमुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत कच्च्या तेलाच्या आयातीवरील भारताचा खर्च ४६.३ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयात केलेल्या तेलाच्या प्रमाणात फारसा बदल झालेला नसताना, या सहा महिन्यांमध्ये कच्च्या तेलासाठीचा खर्च ६१.९ अब्ज डॉलरवरून ९०.६ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.