.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अमेरिकेनं बेकायदा प्रवाशांना भारतात परत पाठवल्यानंतर पहिल्यांदाच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना परत घेणं ही देशाची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं. बुधवारीच पंजाबच्या अमृतसरमध्ये १०४ प्रवाशी परतले. या सर्वांना अमेरिकेनं बेकायदा प्रवाशी ठरवलंय. भारतात परत पाठवण्याच्या पद्धतीवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. अमेरिकन लष्कराच्या विमानातून पायात साखळ्या आणि हातात बेड्या घालून या प्रवाशांना मायदेशी पाठवण्यात आलं.