Free Trade Agreement Between India And EU Set For Approval
Esakal
देश
१९ वर्षांपूर्वी सुरू झालेली चर्चा, आता निर्णय; भारत EU व्यापारी करारावर आज होणार शिक्कामोर्तब
India EU Summit : भारत आणि युरोपियन संघाच्या शिखर परिषदेत मुक्त व्यापार कराराच्या चर्चेच्या समारोपाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये सुरू झालेली चर्चा आज पूर्ण होणार आहे.
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर व्यापारी करारावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. भारत आणि युरोपियन संघाचे सांस्कृतिक, व्यापारी आणि राजकीय संबंध आणखी दृढ होतील. भारत आणि युरोपियन संघाच्या शिखर परिषदेत मुक्त व्यापार कराराच्या चर्चेच्या समारोपाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या भारत दौऱ्यावर असून प्रजासत्ताक दिनी त्या प्रमुख पाहुण्या होत्या.

