

Country's first indigenous 'H5N1' bird flu vaccine unveiled in Bhopal
Sakal
भोपाळ : बर्ड फ्लूपासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी देशात विकसित करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी ‘एच५एन१’ (H5N1) लशीचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते शुक्रवारी (२० नोव्हेंबर) भोपाळ येथे अनावरण करण्यात आले. ‘बर्ड फ्लू प्रतिबंध आणि प्राणी आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने ही लस म्हणजे भारताची महत्त्वपूर्ण कामगिरी असून, हे भारताच्या आत्मनिर्भरतेचे उदाहरण आहे,’ अशा शब्दांत चौहान यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.