

India GDP Growth
esakal
नवी दिल्ली : मूडीज रेटिंग्ज या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताच्या आर्थिक विकासाबाबतचा अंदाज वाढवून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सात टक्के केला आहे. हा अंदाज आधीच्या सहा टक्क्यांपेक्षा एक टक्का अधिक आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक धक्क्यांनंतरही भारतीय अर्थव्यवस्थेची लवचीकता कायम राहिल्याने हा बदल करण्यात आल्याचे मूडीजने म्हटले आहे. भारताचा विकासदर सर्व जी-२० अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक राहण्याची अपेक्षाही मूडीजने व्यक्त केली आहे.