esakal | भारताची मिसाईल ताकद वाढली; एँटी-रेडिएशन मिसाईल 'रुद्रम'ची यशस्वी चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

Rudram Missile

मिसाईल क्षेत्रात भारताने आणखी एक मोठी झेप घेतली आहे.

भारताची मिसाईल ताकद वाढली; एँटी-रेडिएशन मिसाईल 'रुद्रम'ची यशस्वी चाचणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : मिसाईल क्षेत्रात भारताने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. भारताने आज एँटी-रेडिएशन मिसाईल 'रुद्रम' या लढाऊ विमानाचे सुखोई-30 वरुन यशस्वी परीक्षण केलं. या मिसाईलची निर्मिती डीआरडीओने म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केली आहे. या मिसाईलचे परीक्षण पूर्व सीमेवर करण्यात आलं. भारताने अलिकडेच ब्रह्मोसच्या सुधारित मिसाईलचे आणि शौर्य मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. सीमेवर चीनसोबत तणावाची परिस्थिती असताना या मिसाईलचे यशस्वी परीक्षण होणे महत्वपूर्ण मानलं जात आहे. 

गेल्या सोमवारी भारताने ओडीसाच्या सीमेवर ह्वीलर द्वीपवरुन सुपरसोनिक असिस्टेड रिलीज ऑफ टॉसरपीडो (एसएमएआरटी) चे यशस्वी परीक्षण केले. टॉरपीडोच्या रेंजच्या बाहेर एँटी सबमरीन वॉरफेयर (एएसडब्ल्यू) अभियानात हे मिसाईल अत्यंत उपयोगी सिद्ध होणार आहे. या मिसाईलच्या परीक्षणानंतर भारतीय वायु सेनेच्या सामरिक क्षमतेमध्ये आणखी वाढ झाली आहे, यात शंका नाही. 

हेही वाचा - Bihar Election : राजदच्या दिवंगत रघुवंश प्रसाद सिंहाच्या मुलाचा जेडीयूत प्रवेश

'रुद्रम' च्या यशस्वी परीक्षणावर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या संशोधकांचे अभिनंदन केलं आहे. राजनाथ सिंह यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलंय की डीआरडीओने भारतातल्या स्वदेशी टेक्नोलॉजीने नव्या दमाच्या एँटी-रेडिएशन मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे मिसाईल वायुसेनेसाठी आहे. बालासोरच्या परीक्षण स्थळावरुन या मिसाईलचे परीक्षण करण्यात आले आहे. या उल्लेखनिय यशासाठी मी डीआरडीओचे अभिनंदन करतो. 

हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणः फादर स्टॅन स्वामींना अटक, NIA ची कारवाई

शत्रूच्या हवाई सुरक्षेच्या व्यवस्थेला सुरुंग लावण्याच्या उद्देशाने बनवल्या गेलेल्या मिसाईलद्वारे वेगवेगळ्या उंचीवरील ठिकाणांवर हल्ला करता येऊ शकतो. 'रुद्रम' मिसाईल शत्रू देशाच्या रडार यंत्रणेलाही उध्वस्त करु शकतो. 

loading image
go to top