esakal | एअरफोर्समध्ये आता स्वदेशी 'तेजस' विमानांचा ताफा; 48 हजार कोटींचा व्यवहार
sakal

बोलून बातमी शोधा

mig tejas

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील CCS ने आज ऐतिहासिक अशा सर्वात मोठ्या स्वदेशी संरक्षण कराराला मंजुरी दिली. हा करार 48 हजार कोटी रुपयांचा आहे.

एअरफोर्समध्ये आता स्वदेशी 'तेजस' विमानांचा ताफा; 48 हजार कोटींचा व्यवहार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली  - संरक्षण प्रकरणांच्या कॅबिनेट समितीने बुधवारी 48 हजार कोटींचा करार केला आहे. हवाई दलात 83 तेजस हलक्या लढाऊ विमानांची खरेदी याअंतर्गत करण्यात येणार आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड तयार करणाऱ्या या विमानांची खरेदी 48 हजार कोटींमध्ये होणार आहे. भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी स्वदेशी संरक्षण साधनांची खरेदी आहे. 

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील कमिटीने हा करार केला आहे. मार्च 2020 मध्ये डिफेन्स एक्विझिशन काउन्सिलने 83 अॅडव्हान्स मार्क 1A व्हर्जनच्या विमान खरेदीवर शिक्कामोर्तब केलं. मोदींच्या अध्यक्षतेखालील CCS ने हा करार केला. 

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील CCS ने आज ऐतिहासिक अशा सर्वात मोठ्या स्वदेशी संरक्षण कराराला मंजुरी दिली. हा करार 48 हजार कोटी रुपयांचा आहे. यामुळे देशाच्या हवाई दलाची ताकद स्वदेशी LCA तेजसमुळे आणखी वाढणार आहे. भारताच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. 

हे वाचा - कर्नाटकात पैसे घेऊन मंत्रिपदांचे वाटप; भाजप आमदाराचाच आरोप

राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, तेजस विमान पुढच्या काही वर्षांमध्ये भारतीय हवाई दलासाठी बॅकबोन ठरणार आहे. HAL ने त्यांच्या सेकंड लाइन मॅन्युफॅक्चरिंग सेटअपची सुरुवात नाशिक आणि बेंगळुरु डिव्हिजनमध्ये सुरु केली आहे. याआधी करण्यात आलेल्या 48 लढाऊ विमानांच्या करारापेक्षा हा करार वेगळा आहे. पुढच्या सहा ते सात वर्षात ही विमाने हवाई दलात दाखल होतील. 

loading image
go to top