OBC Creamy layer : केंद्र सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील आरक्षणाचा लाभ खालच्या आर्थिक स्तरातील घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार क्रिमी लेयरच्या व्याप्तीत सुधारणा करून, उत्पन्नासोबतच पद व वेतनश्रेणीच्या आधारावर समानता निश्चित करण्याचा विचार करत आहे. यामुळे केंद्र-राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, विद्यापीठे आणि खासगी क्षेत्रातील उच्च पदावरील अधिकारी व श्रीमंत घटकांना क्रिमी लेयरमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.