म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना आदेश

म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना आदेश
Summary

महाराष्ट्रात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 1500 रुग्ण आढळले आहेत. तर 90 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - भारतात (India) कोरोनानंतर (Corona) होणाऱ्या म्युकरमायकोसिसचा (mucormycosis) प्रादुर्भाव वाढला आहे. म्युकरमायकोसिसला ब्लॅक फंगस असंही म्हटलं जातं. आता याबाबत केंद्राने राज्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ब्लॅक फंगसला साथरोग कायद्यांतर्गत Notifiable disease म्हणून अधिसूचित करा आणि सर्व रुग्णांची नोंद करा असं केंद्राने म्हटलं आहे. यामुळे आता ब्लॅक फंगसचे सर्व रुग्ण आणि संशयित रुग्ण यांची माहिती आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात येईल. (India government urged States make mucormycosis a notifiable disease under Epidemic Diseases Act 1897)

म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना आदेश
मास्क, सोशल डिस्टन्सिंगबद्दल केंद्राची नवी नियमावली

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी राज्याला पत्र पाठवून याची माहिती दिली आहे. या पत्रात म्हटलं की, सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, मेडिकल कॉलेजला ब्लॅक फंगसच्या स्क्रीनिंग, डायग्नोसिस आणि मॅनेजमेंटच्या गाइडलाइनचं पालन करावं लागेल.

म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना आदेश
महाराष्ट्रात तरुणाईच्या मृत्यूचे प्रमाण जास्त का ?

महाराष्ट्रात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 1500 रुग्ण आढळले आहेत. तर 90 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांनी आधीच ब्लॅक फंगसला महामारी घोषित केलं आहे. तामिळनाडुत 9 रुग्ण आढळले आहेत. त्यांनीसुद्धा ब्लॅक फंगसला Public Health Act अंतर्गत नोटीफाय केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com