भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकाला रात्री पाठवले परत

Indo China
Indo China

लडाख : भारत-चीनदरम्यान LAC वर तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांना अद्याप यावर तोडगा काढून हा तणाव मिटवता आला नाहीये. लष्करी पातळीवर चर्चेच्या अनेक बैठका पार पडल्या असल्या तरीही अद्याप परिस्थिती मात्र 'जैसे थे' आहे. या दरम्यानच काल घडलेली एक घटना भारताचे शांतीसाठीचे प्रयत्न सगळ्या जगाला दाखवून देते. भारताला चीनसोबत कसल्याही प्रकारचे युद्ध नको आहे. मात्र, कुटील कारवायांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असाच भारताचा पवित्रा आजवर राहिला आहे. 

गेल्या सोमवारी एक चीनी सैनिक LAC वर भटकत पोहोचला होता. या सैनिकाला भारतीय सैनिकांनी पकडलं होतं. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या या सैनिकाला पूर्व लडाखच्या चुमार-डेमचोक परिसरात भारतीय सैनिकांनी पकडलं होतं. लडाख परिसरात पकडल्या गेलेल्या या सैनिकाला भारताने पुन्हा चीनच्या हवाली केलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा चुशूल मोलडो मीटिंग पॉइंटवर चीनच्या या सैनिकाला परत पाठवण्यात आले. या चीनी सैनिकाचे नाव वांग या लोंग असं होतं. 

पुर्व लडाख परिसराच्या डेमचोक भागात 19 ऑक्टोबरला वांग या लोंगला पकडलं गेलं होतं. वांग हा सैनिक भटकल्यामुळे वास्तविक नियंत्रण रेषेच्या म्हणजेच LAC च्या पलिकडे भारतीय सीमेच्या हद्दीत घुसला होता. भारतीय सैन्याने या सैनिकाला पकडल्यानंतर त्याला थंडीपासून वाचण्यासाठी मदत केली. त्याला आवश्यक त्या मेडीकल मदतीसह जेवण आणि गरम कपडेदेखील दिले. 
चीनच्या सेनेने आपल्या गायब सैनिकाला परत करण्याची मागणी केली होती. ज्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल अंतर्गत सगळी औपचारिकता  पुर्ण करुन वांगला चीनच्या हवाली केलं. याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय आणि चीनी सैनिक आमने-सामने आले होते. त्यानंतर दोन्ही देशांतील तणाव हा दिवसेंदिवस वाढतच गेला होता. 

जून महिन्यात लडाखमधील गलवान घाटीमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये चकमक घडली होती, ज्यात 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. या चकमकीत अनेक चीनी सैनिकही मारले गेले होते. तर पँगाँग त्सो मध्ये दोन्ही देशांच्या दरम्यान एकाहून अधिकवेळा एयर शॉट चालवण्याची घटनादेखील घडली आहे. त्यामुळे, भारत-चीन सीमेवर तणाव आहे. हा तणाव मिटवण्यासाठी अनेकदा बैठका झाल्या असल्या तरीही त्या अयशस्वी ठरल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com