India: करतारपूर साहिब कॉरिडॉर आजपासून खुला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करतारपूर साहिब कॉरिडॉर

करतारपूर साहिब कॉरिडॉर आजपासून खुला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरू नानक देव जयंतीदिनी (ता. १९) साजऱ्या होणाऱ्या प्रकाशपर्वाच्या आधी करतारपूर साहिब कॉरिडॉर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (ता. १७) तो खुला केला जात असल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी आज ट्विटद्वारे दिली.

हा मुद्दा पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा ठरण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी आता राजकीय दावे देखील सुरू झाले आहेत.

गुरू नानक देव यांचे अंतिम काळात वास्तव्य असलेल्या आणि आता पाकिस्तानात असलेल्या करतारपूर येथील गुरुद्वाराला जोडणारा कॉरिडॉर भारत आणि पाकिस्तानने सुरू केला आहे. मात्र कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनमुळे वर्षभराहून अधिक काळापासून हा कॉरिडॉर बंद आहे.

हेही वाचा: बुलडाणा : तलाठ्यास लोटपोट करून गाडी खाली घेण्याची धमकी

पंजाब विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रकाशपर्वाच्या निमित्ताने हा कॉरिडॉर सुरू करण्याची मागणी पुढे आली होती. शुक्रवारी गुरू नानक जयंती असून या दिवशी प्रकाशपर्व उत्सव साजरा केला जातो.

काही दिवसांपूर्वी पंजाबमधील भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच मोदी यांना भेटून करतारपूर साहिब कॉरिडॉर सुरू करण्याची मागणी केली होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही गुरू नानक जयंती आधी करतारपूर साहिब कॉरिडॉर सुरू केला जावा, असा आग्रह केंद्र सरकारकडे धरला होता.

हेही वाचा: बालविवाह रोखा, अन्यथा पदाला मुकाल : रूपाली चाकणकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने

१७ नोव्हेंबरपासून करतारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा खुला करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे शीख भाविकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल. हा निर्णय श्री गुरू नानक देवजी आणि शीख समुदायाप्रती मोदी सरकारची अपार श्रद्धा दर्शविणारा आहे.

- अमित शहा, केंद्रीय गृह मंत्री

loading image
go to top