मोंबासा ते युगांडा रेल्वेपासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत, भारत केनियाचं नातं कसं घट्ट बनलं

India Kenya relations भारतीय मजूर मोंबासा ते युगांडा हा रेल्वे मार्ग बांधायला गेले होते. त्यांच्या घामातून आणि सांडलेल्या रक्तातूनच केनियाच्या आधुनिक अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला.
मोंबासा ते युगांडा रेल्वेपासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत, भारत केनियाचं नातं कसं घट्ट बनलं
Updated on

भारत आणि केनियाचे संबंध हे रेल्वे मार्ग बांधकाम आणि सागरी व्यापार यातून तयार झालेत. १८९८ मध्ये केनियात गुजरात आणि पंजाबमधील मजूर रेल्वेमार्ग बांधण्यासाठी ब्रिटिशांनी नेले होते. तेव्हा केनियातील त्सावो नदीच्या किनारी भारतीय मजुरांचा तंबू असायचा. त्या तंबूत अंधारी रात्र भयंकर असायची. कारण रात्रीच्या वेळी तंबूत शिरून दोन सिंह माणसांना फरफटत नेत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या माणसांचा मागमूसही सापडत नसे. जवळपास ९ महिने असं सुरू होतं. काम थांबल्यानंतर हजारो मजुरांनी तिथून पळ काढला. तंबूत शिरून माणसांना नेणाऱ्या त्या सिंहांना त्सावो मॅन-इटर्स म्हणून ओळखलं जातं. तिथं भारतीय मजूर मोंबासा ते युगांडा हा रेल्वे मार्ग बांधायला गेले होते. त्यांच्या घामातून आणि सांडलेल्या रक्तातूनच केनियाच्या आधुनिक अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला. India Kenya Relations From Railway Tracks to Freedom Struggle

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com