Narendra Modi : ‘इंडिया’ची नजर मंगळसूत्रावर

आमच्या माता-भगिनींकडे सोने असते. ते पवित्र स्त्रीधन म्हणून ओळखल्या जाते. त्याच्या संरक्षणासाठी कायदाही आहे. आता त्यांची नजर ही मंगळसूत्रावर आहे,’
Narendra Modi
Narendra Modi sakal

अलिगड (उत्तरप्रदेश) - ‘काँग्रेस आणि इंडिया आघाडीची तुमची मालमत्ता आणि कमाईवर लक्ष आहे. काँग्रेसचे शहजादे तुमच्याकडे किती संपत्ती आहे? किती पैसे आहेत? तुम्ही किती घरांचे मालक आहात? याची चौकशी करणार आहेत. हे सगळे ताब्यात घेऊन त्याचे सगळ्यांना वाटप करण्यात येईल.

आमच्या माता-भगिनींकडे सोने असते. ते पवित्र स्त्रीधन म्हणून ओळखल्या जाते. त्याच्या संरक्षणासाठी कायदाही आहे. आता त्यांची नजर ही मंगळसूत्रावर आहे,’ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत केली. ही नक्षलवादी आणि डाव्यांची विचारसरणी आहे. अनेक देशांमध्ये डाव्या पक्षांनी या रणनीतीचा वापर करत त्यांची वाट लावली. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला हीच रणनीती भारतामध्ये वापरायची आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तोंडी तलाकच्याविरोधात वेगळा कायदा करून आम्ही मुस्लिम महिलांना सुरक्षा कवच प्रदान केले. हज यात्रेच्या कोट्यामध्ये वाढ करण्यासाठी सौदी अरेबियाच्या युवराजांना विनंती केली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आतापर्यंत लांगूचालनाचे राजकारण केले पण मुस्लिम समुदायाची आर्थिक आणि राजकीय प्रगती व्हावी म्हणून त्यांनी काहीही केले नाही.

अलिगडमधील जनतेने घराणेशाहीचे राजकारण, भ्रष्टाचार आणि लांगूलचालन यांना कुलूप लावले आहे. पण दोन शहजादे मात्र तोच कित्ता गिरवत आहेत.’ यावेळी मोदींच्या बोलण्याचा रोख हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या दिशेने होता.

आधी हल्ले होत असत

‘सीमेवर याआधी दररोज बाँब आणि गोळ्यांचे आवाज ऐकू येत असत. आमचे जवानही त्यात हुतात्मा होत असत. आता हे सगळे काही थांबले आहे. काँग्रेसच्या काळात अनेक मोठ्या शहरांमध्ये बाँब हल्ले करण्यात आले. आता मात्र देशभरातील साखळी बाँबस्फोट पूर्णपणे थांबले आहेत. अलिगड, हाथरसमधील कुटुंबीयांना सध्या मोफत रेशन आणि घरे मिळत आहेत. ही मोदींची गॅरंटी आहे. मी आता थांबणार नाही,’ असे मोदींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com