
पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतात पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे हे प्रयत्न निष्फळ ठरवले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने ड्रोन हाणून पाडले. दरम्यान, पाकिस्तानने दावा केला की, भारताने त्यांच्या तीन एअरबेसवर हल्ला केलाय. यात इस्लामाबादजवळच्या एका एअरबेसचा समावेश आहे. आता भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने देशातील ३२ विमानतळांवरील उड्डाणं १५ मे पर्यंत रद्द केली आहेत.