Maharashtra rainfall prediction
esakal
India Monsoon Forecast : देशात यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाबाबत हवामान विभागाने सावध करणारा अंदाज व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मॉन्सून हंगामात देशभरात सरासरीच्या सुमारे ९० टक्के (कमी-अधिक ४ टक्के) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली (India monsoon forecast 2026) असून, बहुतांश भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. विशेषतः ईशान्य भारत वगळता देशातील इतर सर्व विभागांमध्ये पावसाचा तुटवडा जाणवू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.