
वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये १४७ देशांच्या यादीत भारत ११८ व्या क्रमांकावर आहे. फिनलँड, डेन्मार्क, आयलँड, स्वीडन, नेदरलँड हे देश सर्वात आनंदी ठरले आहेत. भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि बांगलादेश आनंदी असल्याचं या यादीतून दिसून आलं आहे. तर फिनलँड देश गेल्या आठ वर्षांपासून आनंदी देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.