कोरोना लशीचा डोस देण्यात भारताने अमेरिकेला टाकलं मागे

कोरोना लसीचा पहिला डोस देण्यामध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. भारतात आतापर्यंत १७.२ कोटी जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
Corona vaccine
Corona vaccinegoogle file photo
Summary

कोरोना लसीचा पहिला डोस देण्यामध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. भारतात आतापर्यंत १७.२ कोटी जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरच्या नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ४.१४ लाखापासून १.३२ लाखपर्यंत नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. सात मे रोजी देशात कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठली होती. त्यानंतर यामध्ये ६८ टक्क्यांची घट झाली आहे. सात मे रोजी देशभरात आढळलेल्या आकडेवारीशी तुलना केली, तर कोरोना रुग्णांची संख्या ६८ टक्क्यांनी घटली आहे. ६६ टक्के नवे रुग्ण हे पाच प्रमुख राज्यांत आढळत आहेत. तर उरलेले रुग्ण हे अन्य ३१ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात आढळत आहेत. (India overtaken US in administering first dose of Covid vaccine)

यावरून असे दिसून येते की, स्थानिक पातळीवर कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश येत आहे. देशातील २५७ जिल्ह्यांत दररोज १०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. सध्या ३७७ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी. के. पॉल म्हणाले की, 'कोरोना लसीचा पहिला डोस देण्यामध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. भारतात आतापर्यंत १७.२ कोटी जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत १६.९ कोटी डोस देण्यात आले आहेत. ६० पेक्षा अधिक वय असलेल्या ४३ टक्के नागरिकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे.'

दुसरीकडे लहान मुलांनाही लस देण्याचा विचार सुरू आहे. कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिला या लसींची चाचणी घेण्यात येत आहे. जवळपास २५ कोटी डोसची गरज भासणार आहे. याबाबतची सर्व प्रकारची माहिती गोळा केली जात आहे, असंही पॉल यांनी सांगितले.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com