HBD Adbul Kalam: एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होण्यामागे लपलाय मजेशीर राजकीय किस्सा

कलाम राष्ट्रपती होण्यामागे एक खूप मजेशीर राजकीय किस्सा लपलेला आहे आणि या घटनेतील मुख्य सूत्रधार आहेत आत्ताच निधन झालेले समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव
HBD Adbul Kalam
HBD Adbul Kalamesakal

Birthday Special: आज भारताचे बारावे राष्ट्रपती आणि देशाचे मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होण्यामागे एक खूप मजेशीर राजकीय किस्सा लपलेला आहे आणि या घटनेतील मुख्य सूत्रधार आहेत आत्ताच निधन झालेले समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव.

गोष्ट आहे 2002 ची भारताचे 11 वे राष्ट्रपती के आर नारायणन यांचा कार्यकाल संपल्यानंतर १८ जुलै 2002 रोजी सत्ताधारी भाजप प्रणित एनडीएचे समर्थन लाभलेले एपीजे अब्दुल कलाम यांची बारावे राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. या अप्रत्यक्ष निवडणुकीत विरोधकांचे समर्थन लाभलेल्या लक्ष्मी सहगल यांच्यापेक्षा 9 लाख अधिक मत मिळवत ते राष्ट्रपती झाले. भारतासाठी एरोनॉटिकल अभियंता व वैज्ञानिक म्हणून कार्य करणारे कलाम भारताचे मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एपीजे हे एनडीएचे फर्स्ट चॉईस उमेदवार नव्हते आणि त्यांच्या नावाला एनडीएने मान्यता दिली पण एपीजेंना याची कल्पना सुध्दा नव्हती. खरंतर त्यांची संमती सुद्धा घेण्यात आलेली नव्हती असं सांगितल्या जातं. अनेकांना हे माहीत असेल की तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या मुलायम सिंग यांनीच एपीजे अब्दुल कलाम यांचे राष्ट्रपती पदासाठी नाव पुढे केले होते पण हे असं लगेच झालं नाही मुलायम सिंग आणि एपीजे यांचे जुने मैत्री संबंध होते. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मुलायम सिंग यादव देवेगौडांच्या सरकारात संरक्षण मंत्री होते आणि एपीजे कलाम हे त्यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते त्या काळात ते मुलायम सिंग यांच्याकडून हिंदी भाषा सुद्धा शिकत असतात आणि याच काळात त्यांचे मित्रत्वाचे संबंध तयार झाले.

2002 च्या राष्ट्रपती निवडणुकीत एनडीए कडे लोकसभेत तर 55 टक्के बहुमत होतं पण राज्यात विशेषतः युपी मध्ये ते अल्पमतात होते आणि राष्ट्रपतीची निवडणूक लढण्यासाठी केंद्रातील बहुमताबरोबरच राज्य विधानसभेतील आमदारांचाही मतदार म्हणून समावेश होतो.त्यामुळे या अडचणीतून मार्ग काढण्याची मोठी अडचण अटलबिहारी यांच्या सरकारकडे होती.कारण सत्तेतील सरकारच जर स्वतःचा राष्ट्रपती निवडू शकले नाही तर ती मोठ्या अपमानाची गोष्ट ठरली असती व देशाच्या सर्वोच्च पदी विरोधी पक्षाचा व्यक्ती असताना सरकार चालवणं कठीण गेल असत.

HBD Adbul Kalam
Dr. APJ Abdul Kalam Jayanti : मिसाईलमॅनच्या साधेपणाचे 'हे' ५ किस्से माहितीये का?

गेल्याच वेळी अटलजींना फक्त एक वोट कमी पडल्याने त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. म्हणून या निवडणुकीत ते कोणतीही रिस्क घ्यायला तयार नव्हते.त्यांना सर्वपक्ष सहमतीनेच राष्ट्रपतीचे नाव ठरवायचे होते अशाच एका बैठकीत मुलायम सिंगांनी अब्दुल कलाम यांचे नाव सुचवले. बीजेपीच्या वतीने एपीजे अब्दुल कलाम यांच्या उमेदवाराला संमती देण्यात प्रमोद महाजन यांचा सुद्धा सिंहाचा वाटा होता.

HBD Adbul Kalam
APJ Abdul Kalam: 'मिसाईलमॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार

जेव्हा मुलायम यांनी पाठिंबा दिला त्यानंतर इतर विरोधी पक्षांकडे नकार द्यायला विशेष कारण नव्हते. अजुन एक आश्चर्यकारक गोष्ट घडली होती. एपीजेंच्या अगोदर p. c. alexander यांचे नाव उमेदवार म्हणून जेव्हा NDA घटक पक्षांनी मान्य केले होते व दुसऱ्या दिवशी त्यांचे नाव जाहीर करणार होते त्याच्या आदल्या रात्री अटलजींनी अलेक्झांडर यांना शुभेच्छा सुध्दा दिल्या गेल्या होत्या पण चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाच्या विरोधामुळे अलेक्झांडर यांना राष्ट्रपती होता आले नाही आणि जे नाव कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं ते एपीजे अब्दुल कलाम भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती झाले.एपीजे अब्दुल कलाम हे झाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद यांच्यानंतर तिसरे मुस्लिम राष्ट्रपती होते.

HBD Adbul Kalam
Dr. APJ Abdul Kalam Jayanti : मिसाईलमॅनचे दुर्मिळ फोटो पाहिलेत?

मुलायमसिंग यादव यांच्या राजनैतिक खेळीमुळे भारताला एक उत्तम राष्ट्रपती मिळाला ज्यांना आपण पीपल्स President सुद्धा म्हणतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com