Profitable Airline India : नफा मिळवणारी एकमेव विमान कंपनी कोणती?; 'इंडिगो संकट' काळात सरकारनी दिली संसदेत माहिती

Indian aviation sector: लोकसभेत सादर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीवरून भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचे चिंताजनक चित्र समोर आलय.
Indian Airlines
Indian Airlines sakal
Updated on

Profitable Airline in India government update presented in Parliament : मागील काही दिवसांमध्ये देशातील आघाडीची एअर लाइन कंपनी असणाऱ्या इंडिगोमधील ऑपरेशनल संकटाने अनेक प्रश्न निर्माण केले असून, संपूर्ण प्रणालीला धक्का दिला आहे. आधीच स्पर्धक विमान कंपन्या आर्थिक संकटांचा सामना करत असताना, इंडिगोच्या सेवेतही मोठा अडथळा निर्माण झाल्याने देशभरातील लाखो विमान प्रवाशांना प्रवासासाठी मर्यादित पर्याय समोर दिसत आहेत. परिणामी विमानतळांवर गर्दी वाढत आहे आणि विमान प्रवासाचे  भाडे देखील गगनाला भिडत आहेत, याचा परिणाम प्रवाशांच्या असंतोषातून दिसत आहे.

नुकतीच लोकसभेत सादर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीवरून भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचे चिंताजनक चित्र समोर आलय. मागणीत सातत्याने वाढ होत असूनही, उद्योग सध्या मोठ्या प्रमाणात तोट्यात दिसत आहे.

खरंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या लेखी उत्तरानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात नफा मिळवणारी इंडिगो ही एकमेव मोठी विमान कंपनी होती. या काळात कंपनीने ७,२५३ कोटींचा नफा नोंदवला होता. याउलट, सरकारी मालकीच्या विमान कंपन्यांना एअर इंडियाला ३,९७६ कोटी, एअर इंडिया एक्सप्रेसला ५,८३२ कोटी, अकासा एअरला १,९८६ कोटी आणि अलायन्स एअरला ६९१ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. एवढंच नाहीतर स्पाइसजेट देखील तोट्यात राहिली, तिने ५६ कोटींचा तोटा नोंदवला. मात्र स्टार एअर कॅरियर ही छोटी कंपनी यास अपवाद होती, ज्यांनी ६८ कोटींचा नफा नोंदवला.

Indian Airlines
IndiGo Chairman Apology Video : आता ‘इंडिगो’च्या अध्यक्षांचाही माफीनामा ; ‘CEO’नी आधीच सरकारसमोर जोडले होते हात!

याआधी म्हणजेच २०२२-२३ आर्थिक वर्षात, भारतीय विमान कंपन्यांना १८ हजार ६०० कोटींपेक्षा जास्त सामूहिक तोटा सहन करावा लागला होता. यामध्ये एकट्या एअर इंडियाला ११ हजार ३८७ कोटींचा तोटा झाला, तर इंडिगोलाही ३१६ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता.

Indian Airlines
Hardik Pandya Sixes Video : हार्दिकने 'राउडी' स्टाइलमध्ये एकाच षटकात ठोकलेले दोन कडक ‘सिक्स’ पाहून ‘BCCI’पण प्रचंड खूश म्हटले...

मात्र यानंतर पुढील आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्येच इंडिगोने जोरदार पुनरागमन केले आणि ८ हजार १६७ कोटींचा नफा नोंदवला, परंतु इतर विमान कंपन्या तोट्याच्या दलदलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com