नकाशा प्रकरणावरून भारताने नेपाळला दिले प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मे 2020

भारताच्या विरोधाला झुगारून नेपाळने नवा राजकीय आणि  प्रशासनिक नकाशा तयार केला.  ज्यामध्ये लिपूलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारतीय प्रदेश आपला असल्याचे नेपाळने दाखवले आहे.  

नवी दिल्ली : भारताच्या विरोधाला झुगारून नेपाळने नवा राजकीय आणि प्रशासनिक नकाशा तयार केला. ज्यामध्ये लिपूलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारतीय प्रदेश आपला असल्याचे नेपाळने दाखवले आहे. नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार नेपाळचा हा नवीन नकाशा बनवण्यात आला आहे. नेपाळचे भू-प्रबंधन सुधार मंत्री पद्मा अरयाल यांनी हा नकाशा जारी केला आहे. यावर भारताने आपली प्रतिक्रिया देत, भारताच्या क्षेत्रीय अखंडतेचा आदर करण्याचे आव्हाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लिपूलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा असा जवळपास ३९५ वर्ग किमीचा भारतीय भूभाग नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाने आपला असल्याचा दावा करत, हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाच्या नकाशात पुन्हा सामील करण्यात येणार असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या भारतीय प्रदेशांचा समावेश राजकीय आणि प्रशासनिक नकाशात नव्याने केला असून, यासोबतच गुंजी, नाभी आणि कुटी या गावांना देखील सामील करण्यात आले आहे. नेपाळच्या या निर्णयावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत, नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळने भारताच्या सार्वभौमत्वाचा  आदर करत भारताच्या क्षेत्रीय अखंडतेचा सन्मान करावा, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले आहे. शिवाय नेपाळने खोटा कार्टोग्राफिक न बनवता आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आव्हाहन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. 

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

दरम्यान काही दिवसांपूर्वी धारचुला ते लिपूलेख पर्यंतच्या रस्त्याचे उदघाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. यामुळे मानससरोवर या तीर्थस्थळी जाण्यासाठीचा मार्ग सोयीचा आणि सुकर होणार आहे. मात्र नेपाळकडून यास आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हा भाग आपला असल्याचे म्हंटले होते. नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी भारतासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मजबूत करायचे असेल तर दोन्ही देशांनी याअगोदर असणारे ऐतिहासिक गैरसमज दूर होणे गरजेचे असल्याचे म्हंटले होते. शिवाय नव्या नकाशामुळे जर कोणाला राग येणार असेल तर त्याची काळजी आम्ही करणार नसल्याचे विधान त्यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Reacts to New Nepal Map Issue

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: