esakal | देशात २४ तासात नव्या ५२०५० रुग्णांची नोंद; तर तब्बल एवढ्या जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

India records 52050 fresh COVID-19 cases tally mounts to 1855746

कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. भारतात मागील २४ तासात ५२०५० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, देशात एकूण ८०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात २४ तासात नव्या ५२०५० रुग्णांची नोंद; तर तब्बल एवढ्या जणांचा मृत्यू

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. भारतात मागील २४ तासात ५२०५० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, देशात एकूण ८०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आता कोरोनाग्रस्तांची संख्या १८ लाख ५५ हजार ७४५ झाली असून देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ३८ हजार ९३८ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशात आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून देशातील रिकव्हरी रेट ६६.३० टक्के असा आहे. देशातील सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ०५लाख ८६ हजार २९८ आहे. तर मागील २४ तासांत देशात एकूण ४४ हजार ३०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना पॉजिटिविटी रेट हा सध्या ७.८६ टक्के असा आहे. म्हणजेच देशात होणाऱ्या कोरोना टेस्टपैकी ७.८६ टक्के लोक हे कोरोना पॉजिटिव्ह सापडत आहेत. मागील २४ तासांत म्हणजेच ३ ऑगस्टच्या एका दिवसात देशात एकूण ६ लाख ६१ हजार ८९२ लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. आता देशातील एकूण कोरोना टेस्टचा आकडा हा जवळपास दोन कोटींच्या घरात गेला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

रामजन्मभूमी पूजनासाठी आंबेडकरांच्या जन्मगावची आणली माती

२४ तासात पॉजिटिव्ह रुग्ण सापडलेली टॉप फाईव्ह राज्ये
महाराष्ट्र:
८ हजार ९६८
आंध्र प्रदेश: ७ हजार ८२२
तमिळनाडू: ५ हजार ६०९
कर्नाटक: ४ हजार ७७५२
उत्तर प्रदेश:  ४ हजार ४४१

२४ तासात सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झालेली टॉप फाईव्ह राज्ये
महाराष्ट्र:
२६६
तमिळनाडू: १०९
कर्नाटक: ९८
आंध्र प्रदेश: ६३
पश्चिम बंगाल: ५३