२४ तासांत ३५४ रुग्णांचा मृत्यू; १०० दिवसापूर्वीचा विक्रम कोरोनानं मोडला

२४ तासांत ३५४ रुग्णांचा मृत्यू; १०० दिवसापूर्वीचा विक्रम कोरोनानं मोडला

coronavirus india update : भारतामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ५३ हजार ४८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ४१ हजार २१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासांत देशात कोरोनामुळे ३५४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही १०४ दिवसांतील सर्वाधिक नोंद आहे. याआधी १५ डिसेंबर २०२० रोजी ३५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

मंगळवारी एकट्या महाराष्ट्रत १३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात लागोपाठ सहाव्या दिवशी १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.  महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांनं देशाची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली होती. देशातील सर्वाधिक कोरोना वाढणाऱ्या पहिल्या १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील ८ शहरांचा समावेश आहे. 

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एक कोटी २१ लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जवळपास एक कोटी १४ लाख जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. देशात आतापर्यंत एक लाख ५२ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या पाच लाख ४९ हजार जणांवर उपचार सुरु आहे.

दरम्यान, 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु होणार आहे. आतापर्यंत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाचे नागरिक जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, अशांना लस दिली जात होती. सरकारने लवकरात लवकर मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने नुकतेच हे पाऊल उचलले आहे. आता कोणताही व्यक्ती ज्याचे वय 45 पेक्षा जास्त आहे, त्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनही करता येईल आणि रुग्णालयातही जाऊन लस घेता ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com