प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती

प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती

नवी दिल्ली - भारतात (India) आज ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा केला जात आहे. कोरोनाची (Corona) महामारी अजून संपलेली नाही, त्यामुळे नियमांचे पालन करावे, कोरोनाच्या नियमांचे पालन करणं हा राष्ट्रधर्म असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना म्हटलं होतं.

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके. फ्लाय पास्टमध्ये विमानांच्या आत कॉकपिटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून विहंगम अशी दृश्ये दिसत आहेत.

प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती
राजपथावर अवतरली महाराष्ट्रातील जैवविविधता!चित्ररथाची खास झलक

पंजाबने राजपथावर स्वातंत्र्यलढ्यात पंजाबचं योगदान या थीमवर चित्ररथ तयार केला होता. यात भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना दाखवण्यात आलं होतं. यात सायमन कमिशन विरोधातून जनरल डायरची हत्येचा प्रसंगही दाखवण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती
PM मोदींच्या लूकची चर्चा; निवडणूक असलेल्या दोन राज्यांशी संबंध

महाराष्ट्रातील जैवविविधता दाखवणारा चित्ररथ यंदा राजपथावरील संचलनात होता. यावर फळांचा राजा आंबा, राज्य प्राणी शेकरू, राष्ट्रीय पक्षी मोर, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती होत्या. झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा, असा संदेश महाराष्ट्राने दिला.

राजपथावर भारतीय हवाई दलाच्या चित्ररथाचे संचलन झाले. भविष्यासाठी बदलणारं हवाई दल या थीमवर आधारीत चित्ररथ आहे.

प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती
Republic Day 2022: महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता सुदेश भोसलेंच्या आवाजात

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर दाखल झाले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद थोड्याच वेळात पोहोचतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर ते राजपथावरील कार्यक्रमासाठी दाखल झाले.

दिल्ली - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण केलं.

उत्तराखंडमधील कुमाऊ इथंही इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी शून्य तापमानात १ हजार फुटांवर ध्वजारोहन करत प्रजासत्ताक दिन साजरा केला.

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी १५ हजार फुटांवर प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्यांनी उणे ३५ अंश सेल्सिअस तापमानात लडाख सीमेवर झेंडा फडकावत परेडही केली.

कसा असेल कार्यक्रम?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं जाऊन श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर २१ तोफांची सलामी देत तिरंगा फडकावला जाईल. परेडची सुरुवात नेहमीप्रमाणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सलामी घेत सुरु होईल. यानंतर शौर्य पुरस्कारांचे वितरण होईल. यंदा सरकारने एक आठवडाभर प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी साडेदहा वाजता सुरु होणार परेड

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणारी परेड ही सकाळी १० ऐवजी १०.३० वाजता सुरु होईल. तसंच यावेळी आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्लाय पास्ट होणार आहे. यामध्ये लढाऊ विमाने त्यांची कौशल्ये दाखवतील.

राजपथावर जलशक्ती मंत्रालयाचा एक चित्ररथ असणार आहे. यामध्ये जल जीवन मिशनने लोकांच्या आयुष्यात कशा पद्धतीने बदल करण्यासाठी प्रयत्न केले गेले हे दाखवले जाणार आहे. लडाखमध्ये १३ हजार फुट उंचावर नळाने पाणी पोहोचवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचं यातून दाखवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com