Republic Day 2022: महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता सुदेश भोसलेंच्या आवाजात

महाराष्ट्राचं वैभव पुन्हा एकदा दिल्लीतील राजपथावर पहायला मिळालं.
Sudesh Bhosale
Sudesh Bhosale

Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर विविध राज्यांचे चित्ररथ पहायला मिळतात. यंदा महाराष्ट्राचं वैभव पुन्हा एकदा दिल्लीतील राजपथावर पहायला मिळालं. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra tableau) हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. महाराष्ट्राची जैवविविधता ही यंदाच्या चित्ररथाची वैशिष्ट्य आहेत. या चित्ररथावर महाराष्ट्र असं मध्यभागी लिहिण्यात आलं असून त्यावर भव्य ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. या चित्ररथाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosle) यांच्या आवाजातील चित्ररथाची कविता. सुरुवातीला ही कविता हिंदीत रेकॉर्ड करण्यात आली होती. सुदेश भोसले यांनी हिंदी आणि नंतर मराठीतही ती रेकॉर्ड करून दिल्लीला पाठवली. तेव्हा महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी मराठीतील कविता योग्य असल्याचं लक्षात घेऊन मराठी कवितेला परवानगी देण्यात आली.

या चित्ररथाबाबत सांगताना सुदेश भोसले म्हणाले, "महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून मला फोन आला होता. त्यांना मी लगेचच कवितेसाठी होकार दिला. ५० सेकंदांची ही कविता आहे. हा मला मिळालेला राष्ट्रीय सन्मान आहे. सुरुवातीला मला हिंदीत कविता लिहून देण्यात आली होती. मी हिंदीतील रेकॉर्डिंग त्यांना पाठवलं. त्याचसोबत महाराष्ट्र सरकारसाठी मी मराठी कवितासुद्धा रेकॉर्ड करून पाठवली. जेव्हा दिल्लीमध्ये या दोन्ही कविता ऐकल्या गेल्या, तेव्हा त्यांनी मराठी कविता निवडली."

Sudesh Bhosale
अवघा राजपथ महाराष्ट्रमय! प्रजासत्ताकदिनी चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन

महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्य-

‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’च्या आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली. तसेच महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com